एसएनडीटी महाविद्यालयात जागतिक मराठी दिवस साजरा

0

शहादा । सिनिअर आर्ट्स महिला महाविद्यालयात आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस मराठी विभागातर्फे साजरा करण्यात आला. सुरुवातीस कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर मराठी विभाग प्रमुख प्रा.राजेंद्र निकुंभे यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर प्रा.संतोष तमखाने यांनी मराठी भाषा कशी वापरली जाते,इंग्रजीचे वाढते आक्रमण या बद्दल विचार मांडले.

प्रा.ज्ञानेश्वर गवळे यांनी इतिहासकालीन मराठी ,ज्ञानेश्वरांचे मराठीला योगदान या बद्दल आपले विचार मांडले तर प्रा.कैलास चव्हाण यांनी शीघ्रकाव्य रचून मुलींना 13 कविता वाचून दाखवल्या. त्या नंतर प्रा.किरण माळी यांनी मनोगतात सांगितले की, गोव्याचे लोक देखील मराठी उत्कृष्ट पध्द्तीने बोलतात मग आपल्याला मराठी बोलायला काय हरत आहे? आभार प्रदर्शन प्रा.काकासाहेब अनपट यांनी मानलेत. अध्यक्षस्थानी प्राचार्या मंगला चौधरी होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूषण पटेल, मनीष चौधरी, दीपक भामरे यांनी परिश्रम घेतले.