एसएनडीटी महिला महाविद्यालयात मतदार नोंदणी

0

शहादा । येथील रा.ता.को.ऑप एज्यु. सोसायटी संचलित व एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई संचलित सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण विभाग व शहादा तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मतदार नोंदणी दिनाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती शहाद्याचे तहसिलदार मनोजकुमार खैरनार व महाविद्यालयाचे प्र.प्राचार्या मंगला चौधरी, समन्वयक प्रा.संजय बी.पाटील यांनी दिली.

फॉर्म नं.6 भरून नोंदणी
8 जुलै रोजी महाविद्यालयात मतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला आला होता. ज्या विद्यार्थीनींचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थीनी व ज्या विद्यार्थी 1 जानेवारी 2018 पर्यंत 18 वर्षे वय पूर्ण करीत असणार अशा विद्यार्थीनींकउून फार्म नं. 6 भरून घेण्यात आले. सदर मतदार नोंदणीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राचार्य मंगला चौधरी, सहा. कार्यक्रम प्रा.संतोष तमखाने, प्रा.किरण माळी, .एस.एम.चे.नंदुरबार-धुळे जिल्ह्याचे समन्वयक प्रा.के.जे.अनवर, प्रा.ज्ञानेश्‍वर गवळे, विशाल पाटील, सौरभ शहा आदींनी कामकाज पाहिले.