एसएमटी विद्यालयाचे पाचव्या दिवशी श्रींचे विसर्जन

0

होळनांथे । येथील एसमएटी इंग्लिश मेडीयम स्कूलचे गणेस विसर्जन पाचव्या दिवशी उत्सहापूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून बनविलेले गणपती विविध फळे, फुले यांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. दै. जनशक्तिचे प्रतिनिधी योगेश पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.

याप्रसंगी जेष्ठ नागरिक संतोष पाटील, संस्थेचे कोऑरडीनेटर विरपालसिंग राजपुत, गोपाल कोळी, प्राचार्य जेबी जोसेफ, उपप्राचार्य जाधव, कविता पवार, आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धोंचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धावणे, कब्बडी सारखे मैंदानी खेळ लहान मोठ्या व मध्यम गटातून विद्यार्थ्यांनी स्पर्धेंत सहभाग घेतला.