जळगाव । श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅण्ड टेकनॉलॉजी, बांभोरी येथे मुंबई स्थित इराट्रोनिकस कंपनीतर्फे परिसर मुलाखत घेण्यात आली. यात 85 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला, त्यापैकी 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कंपनीतर्फे संचालक प्रीतम साळुंके व प्रदीप बेलवाल यांनी विविध चाचण्या घेतल्या. यात एप्टीट्यूड टेस्ट, टेकनिकल इंटरव्हिव व पर्सनल इंटरव्हिव ह्या फेर्या पार पडल्या. अंतिम फेरीतून इ अँड टी सी विभागाच्या 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या विद्यार्थ्यांची झाली निवड: हेमंत महाले, धनंजय पाटील, प्रतीक वैद्य, अजय विसपुते, सौरभ जोशी, मंदार जोशी, अनिल मोरे, भूपेश झोपे, शंतनू हाडोले आणि अक्षय खैरकार यांची निवड करण्यात आली. परिसर मुलाखतीचे आयोजन डॉ.एस.ए. ठाकूर, ट्रैनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर यांनी केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.के.एस. वाणी, इ अॅण्ड टी सी विभाग प्रमुख डॉ.एस. आर.सुरळकर, शैक्षणिक संचालक डॉ.जी.के. पटनाईक, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.एन.एम.काझी इत्यादींनी अभिनंदन केले.