जळगाव। श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन स्टूडेन्ट असोसिएशन व इंडियन रेड क्रॉस सोसाइटीतर्फे जीवनधारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवून 121 बाटल्यांचे रक्त संकलित केले.
प्राचार्य डॉ.वाणी यांनी केले कौतूक
या शिबिरात सर्वप्रथम प्रा.डी.यू.आडोकर यांनी रक्तदान केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्राचार्य डॉ.के.एस. वाणी यांनी कौतूक करत शुभेेच्छा दिल्या आहे. या शिबिरात डॉ. शेखर सुरलकर व डॉ. विशाल राणा यांनी सुद्धा रक्तदान केले. विद्यार्थ्यांनी यावेळी रक्तदान करण्याचा संकल्प केला. या शिबीरात 121 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
उपक्रमाचे कौतूक
डॉ. सत्येंद्र मिश्रा, डॉ.एस.टी.बेंद्रे, डॉ. शेखर सुरलकर, डॉ.जी.के.पटनायक, डॉ. संजय शेखावत, प्रा.एन.एम.काझी, प्रा.कुणाल पांडे, प्रा.योगेश संतवाणी आदि उपस्थित होते. डॉ. रेदासनी प्रसन्नकुमार, गनी मेमन यांनी सुद्धा शिबिरात उपस्थिती होती. यावेळी रक्तदान करणार्यांना विद्यार्थ्यांचे कौतूक करत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे सूत्र संचालन प्रा.योगेश संतवाणी, प्रा. चरणसिंह पाटिल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.एन.एम.काझी, प्रा. कुणाल पांडेय यांनी मानले.
यांनी घेतले परीश्रम
रक्तदान शिबीरासाठी प्रा. सुनील खोडे, डॉ. पंकज झोंपे, प्रा. आशीष बारी, प्रा. सादिक खान, डॉ.एम.पी. देशमुख, विद्यार्थी शुभम पाटिल, शुभम सुल्ताने, गणेश वारोकार, कौस्तुभ पाटिल, रविकोटपल्ली, अर्पित पाण्डे, निखिल सोनवणे, हर्षदा, निकिता सिंह, रेशमा झोंपे, नेहा पाटिल, कल्याणी कुंभार, मेघना, वर्षा, दीपाली, मोनिका आदींनी यशस्वीतेसाठी काम पाहिले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.