एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात

0

जळगाव । बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आर.एच.गुप्ता व आर्किटेक्ट शशिकांत कुलकर्णी, यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ.के.एस.वाणी, डॉ.संजय शेखावत, डॉ.एस.आर. सुरळकर, डॉ.जी.के.पटनाईक, डॉ.एम.हुसेन, डॉ यु.एस.भदादे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. कृष्णा श्रीवास्तव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा.कृष्णा श्रीवास्तव यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एस. वाणी यांनी पालक मेळाव्यासाठी असलेल्या सर्व उपस्थितांना महाविद्यालयात उपलब्ध असलेयल्या सोईसुविधा व विविध उपक्रमांबाबत माहिती दिली व स्वागतपर भाषण केले. प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट शशिकांत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक आणि महाविद्यालय यांच्या सयुंक्तिक जबादारी विषयी चर्चा केली.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
डॉ.आर.एच.गुप्ता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पालक व महाविद्यलाय यांचा संबध या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन पालक मेळाव्याचेसह संयोजक प्रा मुकेश अहिरराव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. दिनेश पुरी आणि प्रा सुनील आहिरे यांनी केले. या पालक मेळाव्या मध्ये विद्यापीठस्तरीय परिक्षा व खेळ यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यर्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. या पालक मेळाव्यासाठी 500 पालक उपस्थित होते. पालकांनी विचार लेलेल्या प्रसन्नाचे व शंकांचे निरसन केले. या पालक मेळाव्याचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा.एस.के.खोडे, प्रा नितीन जगताप , दीपक बगे, प्रा. सारिका पवार, प्रा.जे.आर. माली, प्रा.मीरा. देशपांडे, प्रा.एन.वाय. घरे, प्रा.दीपमाळा देसाई यांनी अथक परिश्रम केले .