एसएसबीटी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

0

जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व एस एस बी टी अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी, जळगाव यांच्या संयूक्त विद्यमाने वक्त्रुत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे अ‍ॅड.शिरीन अमरेलीवाला, प्रभारी प्राचार्य डॉ.जी.के.पटनाईक, अध्यक्ष डॉ.एस.आर. सुरळकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.एन.एम.काझी, समन्वयिका प्रा.ज्योती माळी उपस्थित होत्या. या स्पर्धेचे उदघाटन नोटरी अ‍ॅड. शिरीन अमरेलीवाला यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी व्यवस्थापकीय संचालक डॉ.एस.आर. सुरळकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.एन.एम.काझी होते. चाकोरी बद्ध जीवनात योग्य तो बदल करणे हे मुलींच्या हातात असते. तसेच मुलींनी शैक्षणिक सिद्ध करून हुंडाबळी, समाजातील वाढती गुन्हेगारी वर नियंत्रणाचा प्रयत्न जरूर करावा, असे अमरेलीवाला म्हणाल्या.

स्पर्धेसाठी 60 विद्यार्थीनींनी नोंदवला सहभाग
वक्तृत्व स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 60 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. महिलांवरील वाढती गुन्हेगारी व त्यावरील उपाय या विषयावर स्पर्धकांनी आपली मतें मांडली. परीक्षक म्हणून अ‍ॅड शिरीन अमरेलीवाला होते. आणि सर्व विजेत्या स्पर्धकांचे व इतर सहभागी स्पर्धकांचे प्रा. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.जी.ए. उस्मानी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के एस वाणी यांनी खूप कौतुक केले. तसेच विजेती स्पर्धकांसह इतर सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जागृती सुरंगे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.ज्योती माळी यांनी मांडले. आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.एन.एम.काझी यांनी केले. प्रा.मयुरी देशमुख, प्रा. दीपमाळा देसाई, प्रा.सारिका पवार आदींनी सहकार्य केले.