एसकेएफ फूटबॉल संघ गोथिया कप स्पर्धेसाठी रवाना

0

सर्व खेळाडू महापालिका शाळेतील विद्यार्थी
पिंपरी-चिंचवड : गोथिया कपचा दहा वर्धापनदिनानिमित्त एसकेएफ इंडियातर्फे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विभागातील शाळांसाठी एसकेएफ क्रीडा कार्यक्रम आयोजित केला आहे. चिंचवड येथील एसकेएफ सेपोर्टस एज्युकेशन प्रोग्राम फॉर स्कूल्स असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल ऑर्सटाडीयस, आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले.

दोन संघ भारताचे प्रतिनिधित्व करणार
या प्रकल्पाबाबत माहिती देताना कार्ल ऑर्सटाडीयस म्हणाले, क्रीडा क्षेत्राच्या माध्यमांद्वारे मुलांमध्ये शारिरिक आणि मानसिक विकास घडवून आणणे हे एसकेएफच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रणेत्या एसकेएफ कम्युनिटी अंब्रेलाअंतर्गत राबविण्यात येणार्‍या या एसकेएफ शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. निवड झालेल्या शाळांमध्ये जेएसकेएफतर्फे नियमित प्रशिक्षण वर्ग घेतले जातील. त्यांचे प्रशिक्षक अतिशय व्यावसायिक पध्दतीने हे प्रक्षिक्षण सुत्रे घेतली जाणार आहे. प्रत्येक शाळेत निवडक विद्यार्थ्यांसाठी एकूण 48 प्रशिक्षण सुत्रे घेतली जाणार आहे, 80 जणांच्या प्रत्येक गटातील पाच गुणवान पात्र विद्यार्थ्यांची त्यांच्या गुणवत्ता आणि कामगिरीनुसार निवड केली जाईल आणि चिंचवड पुणे येथील एसकेएफ क्रीडा अकादमीमध्ये खास प्रशिक्षण दिले जाईल. एसकेएफ शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रमादरम्यान गोथिया कप स्पर्धेसाठीचा संघ यावेळी घोषित करण्यात आला. 17 मुले आणि 12 मुली असे दोन संघ गोथिया कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. गोथिया कप स्पर्धेत सहभागी होण्याचे हे एसकेएफचे दहावे वर्ष आहे.

पंचवार्षिक कार्यक्रम
चिंचवड येथील एसकेएफ प्रकल्पाच्या परिसरातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील 80 गुणवान मुले आणि मुलींची निवड केली जाणार असून या विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळेत व्यावसायिक प्रशिक्षकांद्वारे आठवड्यांतून दोन वेळा फूटबॉल खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जुलै 2018च्या शैक्षणिक वर्षात सुरु झालेला हा कार्यक्रम मे 2023 पर्यंत चालणार आहे. या दरम्यान इयत्ता दुसरीपासून मुलांना शिकविण्यास सुरुवात केली जाणार असून ते इयत्ता दहावीमध्ये जाईपर्यंत त्यांना हे प्रशिक्षण मिळणार आहे.