एसटीचा प्रवास महागणार!

0

मुंबई : एसटी प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरे जावे लागू शकते. कारण तोटा भरून काढण्यासाठी महामंळाने भाडेवाढीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सर्व प्रकारच्या एसटी तिकीटांमध्ये 10 ते 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. इंधनाचे वाढते दर, वेतन करार अशा विविध कारणांमुळे ही भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचार्‍यांचा वेतन करार 1 मेरोजी होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे त्यासाठी प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आधीच खासगी वाहतुकीच्या तुलनेत एसटीचे दर जास्त आहेत.