एसटी आगाराची सरपंच कार्यशाळा

0

नवापुर। नवापुर एस.टी.आगार विभागामार्फेत नवापुर तालुक्यातील 114 सरपंच यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी आगार प्रमुख राजेंद्र अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन लेखाकार बी.एन.बाविस्कर, सहायक कार्यशाळा अधिक्षक वाय.एस.शिवदे, सहायक वाहतुक निरीक्षक नाना भामरे, वसंत गावीत आदी उपस्थित होते. यावेळी आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी म.रा.मा.प.महामंडळ धुळे यांनी 2017 या वर्षात विविध सवलती एस.टी महामंडळाला दिल्या असल्याचे सांगितले. विद्यार्थीनींसाठी प्रवास भड्यातील सवलती टक्केवारी 100 टक्के देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ.5वी 10 वी पर्यत शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यायार्थी मासिक पास (शैक्षणिक) 66.67 टक्के व धंदे व शिक्षण व्यवसाय घेणारे विद्यायार्थी (व्होकेशनल) 66.67 पास देण्यात येत आहे.

50 दिवसाचे भाडे भरुन 90 दिवसासाठी मोफत प्रवास
विद्यार्थ्याना मोठ्या सुट्टीत घरी येणे- जाणे तसेच परीक्षेला जाणे-यण्यासाठी शैक्षणिक कँम्पला जाणेसाठी,आजारी आई वडीलांना भेटण्यास जाण्या येण्यासाठी सवलत देत असल्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थीं स्वत:आजारी व शैक्षणिक सहलीसाठी देण्यात आलेले नैमित्तिक करार 50/टक्के तसेच विद्यार्थ्याना जेवणाचे डबेसाठी 33/टक्के आकारण्यात येईल. राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या व शैक्षणिक स्पर्धा 50/टक्के सवलत देण्यात येत असते. मुंबई पुनर्वसन केंद्रातुन मानसिक द्दष्टया अपंग विद्यार्थ्यान साठी व रेस्क्यु होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीसाठी 50 टक्के आकारले जातात. मानव विकास यांचा साठी 100 टक्के त्रैमासिक पाससाठी 50 दिवसाचे भाडे भरुन 90 दिवसासाठी मोफत प्रवास सवलत,तसेच मासिक पास ज्यात 20 दिवसाचे भाडे आकारुन 30 दिवसाचा मोफत प्रवास सवलत दिली जाते असेही अहिरे यांनी सांगितले.

अवैध वाहनांनी प्रवास टाळा
अहिरे यांनी पुढे सांगितले की, एस.टी.बसने प्रवास करा. अवैद वाहनात प्रवास करु नका असे आवाहन केले. या सर्व सवलती फक्त एस.टी महामंडळ देणार आहे. 15 ऑगस्ट ग्रामसभेत सुध्दा एस.टी.ची या सर्व सवलतीची माहीती द्या असे आवाहन केले. लेखाकार बाविस्कर म्हणाले की या सवलती सर्व आदिवासी बांधवानी घेतली पाहीजे तसेच गावातील नागरीकांना पण सांगितले पाहीजे. यानंतर सहायक कार्यशाळा अधिक्षक वाय.एस.शिवदे, सरपंच ईश्वर गावीत, सुरज गावीत, राहुल गावीत आदींनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन डी.ए.पवार यांनी तर आभार एस.टी.कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी मानले.