एसटी कर्मचारी शासकीय कर्मचारी नाहीत

0

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) कर्मचारी हे शासकीय कर्मचारी नसल्यामुळे त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट मत असल्याचे सांगत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या वादातून आपले अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र एसटी कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या आशा मावळल्या आहेत. एसटी कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतन आयोगाचे लाभ देता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचारी संघटनांशी झालेल्या बैठकीत यापूर्वीच स्पष्ट केले होते. तसेच, वेतनवाढीच्या करारासाठी समिती नेमण्याचे आश्‍वासन त्यांनी संघटनांना दिले असल्याची माहिती परिवहन मंत्री रावते यांनी दिली. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरूवात केल्यानंतर विधानपरिषदेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.