एसटी कर्मचार्‍यांना गणवेश वितरण

0

दापोडी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना गणवेश वितरण सोहळा नुकताच दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत पार पडला. याप्रसंगी आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेवक रोहित काटे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कार्यशाळा व्यवस्थापक रघुनाथ कांबळे होते.

आमदार चाबुकस्वार यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल व विविध योजनांबद्दल कौतूक केले. महामंडळाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याबाबत त्यांनी आश्‍वासन देऊन शुभेच्छा दिल्या. नंतर 19 कर्मचार्‍यांना गणवेश वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन कल्याण अधिकारी स्वाती वसेकर यांनी केले. तर प्रियदर्शनी वाघ यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन अधिकारी वर्ग व कल्याण अधिकारी व कल्याण समिती व भांडार अधिकारी यांनी केले.