एसटी कर्मचार्‍यांना त्रास देणार्‍यांना त्यांची जागा दाखवू

0

शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा ईशारा

मुक्ताईनगर- शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एस.टी.कामगार सेनेची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर व जळगांव विभागातील अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारावर चर्चा करण्यात आली. अनेक गैरव्यवहार व मुजोरी कानावर आली असून त्यांना सेनेचा हिसका दाखवावाच लागेल, अशी तंबी प्रसंगी चंद्रकांत पाटलांनी दिली. अधिकार्‍यांनी जर आपली सीमा ओलांडून कार्य केलं तर जागेवरच शिवसेना हिसका दाखवेल, असा सज्जड दमही त्यांनी दिला. सूत्रसंचालन अनिल सपकाळे यांनी तर एसटी कर्मचार्‍यांच्या वतीने गोपाळ पाटीलयांनी सर्व समस्यांना वाचा फोडली.

अधिवेशनाची सर्व जबाबदारी घेण्यास तयार
एस.टी.कामगार सेनेमार्फत जर मुक्ताईनगर येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले तर सर्व स्वरूपाची सर्वाधिक जबाबदारी घेण्यास तत्पर असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले. संजय सुर्यवंशी, मधु चौधरी (रावेर), प्रल्हाद चौधरी, दीपक कोळी, देवेंद्र ठाकरे, रमेश जाधव, आनंत पुरी, सुनील चौधरी, बी.व्ही. महाले, बॉबी सुरवाडे, व्ही.टी.तायडे, एम.बी.चौधरी, साळुंखे, जगन गोसावी, अनिल कोळी, ईश्वर ठाकरे, आभा वाघ, एस.एन.पाटील, धोंडू सुरवाडे, सौरभ सपकाळे व कामगार सेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.