मुंबई: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकीत आहे. आज सोमवारी राज्यभर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. जळगावात एका कर्मचाऱ्याने पगाराच्या तणावात आत्महत्या केली आहे. दरम्यान राज्य सरकारने आजच तातडीने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा एक पगार जमा करण्याची घोषणा केली आहे. तसेच दिवाळीपूर्वी उर्वरित दोन पगार जमा केले जातील अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. दिवाळी बोनस देखील दिला जाईल असे मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावरून राज्य सरकारवर टीका देखील होत आहे.