गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा सुरू आहे. जळगाव शहर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील तीन महिने अविरतपणे हा दुखवटा सुरू ठेवला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार झाला नाहीये. यामुळे घर चालवण्यासाठी एसटी कर्मचारी इतर व्यवसायाकडे वळले आहेत जातील प्रमुख व्यवसाय म्हणजे भाजीपाला विक्री व्यवसाय.
जळगाव शहर आगारात एकूण ४७८ एसटी कर्मचारी काम करतात. आतापर्यंत एकूण एसटी कर्मचाऱ्यांना पैकी 60 कर्मचारी हे आपापल्या कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. १०० एसटी कर्मचाऱ्यांनी भाजीपाला विक्री करता सुरुवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा जोपर्यंत एसटी चे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत दुखवटा सुरूच असणार आहे असा त्यांचा निर्धार आहे. अशा वेळेस टुंबाचा आणि स्वतःचं पोट भरायचं असेल तर काही ना काही व्यवसाय करणे गरजेचे आहे यासाठी आता एसटी कर्मचारी वेगळ्या व्यवसायाचा शोध घेत आहेत.
जळगाव शहर आगारातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी खासगी गाड्यांमध्येही काम करायला सुरुवात केली आहे. याच बरोबर कित्येक कर्मचारी हे बांधकाम व्यवसायात काम करत आहेत.
सरकारने आमची फसवणूक केली आहे
एसटी कर्मचाऱ्यांना 40% पगार वाढीची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केल्यानंतर एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील असे सर्वांना वाटले होते. जनमानसात देखील यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी विरोधात एक लाट उसळली आहे. मात्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली असून त्यांची फसवणूक केली आहे असा आरोप एसटी कर्मचारी करत आहेत. कारण वास्तवदर्शी चित्र काही वेगळेच आहे प्रत्येका एसटी कर्मचाऱ्याला केवळ नऊ ते दहा टक्केच वेतनवाढ मिळाले आहे असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांचा आहे यामुळे हे आंदोलन जोपर्यंत विलिनकरण होत नाही तोपर्यंत सुरूच राहील असे मत. एसटी कर्मचाऱ्यांनी नोंदवले आहे
जळगाव शहर आगारातील 60 कर्मचारी हे पुन्हा कामावर रुजू झाले असून यांच्यामध्ये ७ चालक १८ वाहक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याच बरोबर जळगाव शहर आगारातून धुळे, चोपडा, चाळीसगाव ,पाचोरा, एरंडोल, मुक्ताईनगर व नाशिक अशा ठिकाणी बस रवाना झाल्या आहेत.