एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल धिवार

0

दापोडी : राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतील मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल धिवार व सचिवपदी अनिल उलपे यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये चालू वर्षाच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली.

इतर कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष – गणेश जाधव, उमेश कुलकर्णी, दिपक भुरकुंडे आणि विशाल शिंदे. कार्याध्यक्ष-शांताराम शिंदे, सहसचिव-संदीप रायकर, सागर सोनवणे, संतोष सपकाळ, विठ्ठल शिंदे. प्रादेशिक सचिव व्यंकट सुपलकर, संघटक तुळशीराम मुंडे, खजिनदार विलासराव मते, प्रसिद्धी प्रमुख अरविंद गोडबोले, महिला राखीव उपाध्यक्ष विजयालक्ष्मी स्वामी, कविता कोळी, महिला राखीव सहसचिव उषा पवार. यावेळी चंद्रकांत चव्हाण व बबन मका प्रमुख उपस्थित होते.