एसटी कामगार सेनेतर्फे मोफत वैद्यकीय तपासणी

0

जळगाव । महाराष्ट्र एसटी कामगार सेना व मुक्ती फौंडेशन द्वारा एसटी महामंडळाच्या 69 व्या वर्धापनदिनानिमित्त व मा. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय तपासणी शिबीर पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बसस्थानकाच्या प्रवेशद्वार नजीक एसटी कामगार सेनेच्या नवीन फलकाचे अनावरण सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी श्रीफळ सोडून केले. या प्रसंगी आपले स्वास्थ निरोगी राहिले तरच आपण प्रवाशी बंधू भगिनींना उत्कृष्ट सेवा देऊ शकतो, त्यामुळे चालक वाहकांनी आपले स्वास्थ जपावे असे आवाहन ना. पाटील यांनी केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
या प्रसंगी वैद्यकीय बोर्डाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आमदार राजुमामा भोळे यांनी देखील सदिच्छा भेट दिली. डॉ. नितीन धांडे, अंजली बाविस्कर, डॉ. वैशाली पुरी, डॉ. शिरुडे यांचेसह इंडो अमेरिकन हॉस्पिटल, मीना हॉस्पिटल, श्रद्धा हॉस्पिटल, इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या मदतीने शिबिर पार पडले. ऐकून 600 ते 700 प्रवाशी व कर्मचार्‍यांनी नोंदणी केली व तपासणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री शिवाजी हटकर, आर के पाटील, प्रकाश ठाकरे, सुभाष सोनवणे, कैलास सोनवणे, धर्मराज सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ पाटील यांनी सुरू केले व प्रास्ताविक मुकुंद गोसावी (मुक्ती फाऊंडेशन) यांनी केले.