जळगाव । चुकीच्या मार्गावर बस टाकल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे वाहतूक पोलिसाने बस चालकास थांबवून मेमो फाडण्यास सांगतल्यावरून दोघांमध्ये वाद चांगलाच झाला. वाद थेट शहर वाहतूक पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर काही संघटनांच्या मध्यस्थीने हे प्रकरण शांत करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास घडली.सहभागी झाले होते.
इच्छादेवीपासून ते आकाशवाणी चौकापर्यंत बुलडाणा-सुरत मार्गावरील बस चालकाने राँग साईडने बस टाकल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. यावर आकाशवाणी चौकात सेवा बजावित असलेल्या वाहतूक पोलिसांनी बस क्रमांक एमएच.40.एक्यु.6178 वरील चालकास थांबवुन त्याला जाब विचारून मेमो फाडण्यास सांगितले. मात्र, यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या घटनेमुळे आकाशवाणी चौकात गर्दी जमली होती. हा वाद विकोपाला गेल्याने बस थेट शहर वाहतूक शाखेकडे नेण्यात आली. या घटनेसंदर्भात बस आगार प्रमुखांना देखील माहिती कळविण्यात आली होती. यावर चुकी असेल तर कारवाई करा, अश्या शब्दांत आगार प्रमुखांनी पोलीस कर्मचार्यांना सांगितले. तसेच वाहनचालकास देखील समज दिली. या घटनेमुळे शहर वाहतूक पोलीस ठाण्यात गर्दी जमली होती. काही संघटनांच्या पुढाकाराने हा वाद मिटविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
चोरीप्रकरणी एकाला अटक
जळगाव तालुक्यातील कुसंबा गावातील गणपतीनगरात रहिवासी विकास आत्माराम पाटील यांची एमएच.19.सीजी.9215-ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी भुषण उर्फ जिगर रमेश बोंडारे याला अटक केली असून त्याला 7 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.