साक्री। तालुक्यातील शेवाळी गावानजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ सकाळी बस ट्रक अपघातात 24 प्रवासी जखमी झाले. साक्रीहून धुळे येथे जाण्यासाठी निघालेली बस क्र. एमएच 11 बीएल 9271 बस चालक विजय चव्हाण हे घेवून जात असतांना शेवाळी जवळील पेट्रोल पंपाजवळ बसने ट्रकला मागून धडक दिली. यावेळी बसमध्ये 40 प्रवाशी होते. यापैकी 24 प्रवासी जखमी झाले आहेत.बस मधील सर्व जखमींना प्रथमोपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी महामंडळाच्यावतीने तात्काळ मदत म्हणून 500 रुपयांची मदत जखमींना करण्यात आली.
जखमींना तत्काळ केले रूग्णालयात दाखल
प्रियंका माळीच (वय 10) घोडदे, प्रमिला हिरे (50) साक्री, फरिदा शेख, साक्री, वासिम खाटीक (24) साक्री, रुबिनाली शेख (32) साक्री, नसरुद्दीन शेख (71) साक्री, अंजना शिवंदे (35) कावठे, भिमराव माळीच (35) घोडदे, सुनंदा मोरे (53) घोडदे, पांडूरंग पवार (75) साक्री, सुभाष साळुखे (58) नांदवन, चैत्राम टिळे (65) विजापूर, शोभा साळुंखे (50) नांदवन, इंदिराबाई खेरनार (56) कारखाना, सुमन अहिरराव (55), धाडणे, सरला अहिरराव (50) धाडणे, अशरफबी खाटीक (57) कारखाना, विद्याबाई भामरे (51) दारखेल, सदाशिव महाजन (51) भांडणे, गजमल चौरे (40) वडपाडा, करिष्मा शेख (10) साक्री, मोहन मोरे (25) धुळे, रेखा माळीच (30) घोडदे, विजय पवार अशी जखमींची नावे आहेत. काहींना उपचार देऊन सोडण्यात आले तर काही जखमींना अधिक तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले.