एसटी वर्कशॉपजवळ कचर्‍याच्या ढिगार्‍याला आग

0

परिसरातील नागरीकांची उडाली धावपळ

जळगाव । अजिंठा चौफुलीकडे जाणार्‍या रस्त्यावरील एसटी वर्क्सशॉपजवळ एसटी महामंडळाची मोकळी जागा आहे. त्याठिकाणी परिसरातील नागरिक कचरा आणून टाकत असतात. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्या कचर्‍याला आग लावली. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण करुन आगीच्या धुराचे लोळ आकाशात उंचच उंच दिसून येत असल्याने परिसरातील नागरिाकांची चांगलीच धावपळ उडाली. याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहित अशी की, शहरातील एसटी वर्क्सशॉपच्या बाजूला एसटी महामंडळाची जागा असून त्या जागेला चारही बाजूने संरक्षण भिंत बांधलेली आहे. या जागेमध्ये परिसरातील नागरिक कचरा आणून टाकत असल्याने याठिकाणी कचर्याचे ढिग साचलेले होते. तसेच या जागेवर गवत देखील वाढलेले असून आज सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास परिसरातील अज्ञान व्यक्तीने या कचर्‍याला आग लावली. परंतु काही क्षणातच त्याठिकाणीवर असलेल्या गवताने देखील पेट घेत असल्याने आग पसरण्यास सुरुवात झाली. दरम्यान आगीचे लोळ उंचच आकाशात दिसून येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते.