जळगाव । जिल्ह्यातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण निर्विघ्नपणे पूर्ण करावे, स्वतःला सक्षम बनवावे या उद्देशाने माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिष्यवृत्ती योजना जून 2008 मध्ये जाहीर करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व उद्योजकीय कौशल्य विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविणे या उद्दात्त ध्येय्य पुर्तीकारिता जळगाव येथील सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना (एसडी-सीड) अंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजना 2018 साठी जाहीर करण्यात आली आहे.
आवाहन
सेवाभावी व्यक्ती किंवा संस्था जळगाव जिल्ह्यातील गुणवंत व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्याने त्यांचे शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी मदत करून त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवू शकतात. विद्यार्थी शिकत असलेल्या शाखेनुसार त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वार्षिक रु. 5 हजार ते 65 हजार रूपयांपर्यंत रक्कम देऊन देणगीदार एक विद्यार्थी एका वर्षासाठी दत्तक घेऊ शकतात, तरी गरजूंनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
इंटरनेटद्वारे अर्ज भरण्याची सोय
एसडी-सीड मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे एसडी-सीडच्या वेबसाईट विनामूल्य आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी या वेबसाईट ची लिंक स्वतंत्रता दिवस 15 ऑगस्ट 2018 पासून 30 सप्टेंबर 2018 पर्यंत सुरु राहील.
एसडी-सीडकडे पाठविण्याची प्रक्रिया
एसडी-सिडच्या वेबसाईट वर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज यशस्वीरीत्या भरण्याविषयी सर्व विस्तृत माहिती व मार्गदर्शन तसेच आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर पोच पावतीची प्रिंट घेऊन त्यासोबत आवश्यक व बंधनकारक असणारी सर्व कागदपत्रे जोडून विद्यार्थ्यांनी ते एसडी-सीड कार्यालयात देलेल्या तारखेपर्यंत पाठवावीत.