एसबीआयचं दिवाळी गिफ्ट; ग्राहकांसाठी सुविधा मिळणार मोफत

0

नवी दिल्ली : सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्तानं ग्राहकांसाठी खास गिफ्ट दिलं आहे. बँकेनं पर्सनल लोनवरची प्रोसेसिंग फी शून्य केली असल्याने ग्राहकांना आता कर्ज घेण्यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. या ऑफरचा फायदा 30 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. जेव्हा तुम्ही कर्ज घेता, त्यावेळी त्यासंबंधी इतरही शुल्क द्यावे लागते. त्यात व्याजाचे पैसे, प्रोसेसिंग फी, एडमिनिस्ट्रेटिव्ह, प्री-पेमेंटसह अन्य गोष्टींचा समावेश केलेला असतो. एसबीआयनं कर्ज घेण्यातल्या प्रक्रियेतील शुल्क संपवले आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत पर्सनल लोन घेणा-यांना यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क द्याव लागणार नाही. त्यामुळे ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.