नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कर्जावरील एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉइंटची कपात केली असून, व्याजदर 10 बीपीएसने कमी होणार आहे. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होणार आहे. नवे दर दि. 10 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. गृहकर्ज स्वस्त होणार असल्याने कर्ज घेणार्यांना दिलासा मिळणार आहे.
एसबीआयने चालू आर्थिक वर्षात पाचव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे.मात्र मुदत ठेवींवरील व्याजदरही कमी केले आहेत.