एसबीआयमधून बोलत असलेल्या सांगत प्रौढाची सव्वा लाखांची फसवणूक

An adult in Warangaon was cheated of half a lakh on the pretext of credit card block भुसावळ :  तालुक्यातील वरणगाव येथील प्रौढाला क्रेडीट कार्ड ब्लॉक करण्याच्या भामट्या महिलेने सव्वा लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ओटीपी मिळवून लांबवली रक्कम
तक्रारदार अनिल प्रभाकर वंजारी (52, वंजारी वाडा, वरणगाव) यांना गुरुवार, 13 रोजी रात्री 9.16 वाजता 9423192419 व 911243983721 क्रमांकावरून आलेल्या कॉलवरील महिलेने एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत हरवलेले क्रेडीट कार्ड ब्लॉक करून देते म्हणत विश्वास संपादन करून ओटीपी क्रमांक मिळवून एक लाख 16 हजार 421 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी वंजारी यांनी गुरुवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत