एसयूव्ही गाडी मागणार्‍या वराला नाकारले…

0

लखनऊ । नवरदेवांची हुंड्यापोटी एसयूव्ही गाडीची मागणी धुडकावत वधूने विवाहच मोडण्याची घोषणा केल्याने उत्तर प्रदेशमधील लालची वराला अखेर पोलिसांकडूनच मानपान घ्यावा लागला. ही घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे घडली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रतापसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या आदल्या रात्री नवरदेवाने एसयूव्ही न दिल्यास लग्न मोडण्याची धमकी दिली. शेवटी नवरीने स्वतःच लग्न मोडल्याचे जाहीर करून हॉल सोडला. नवरदेव मात्र डोक्याला हात लावून बसला.

उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये लग्नात हुंडा मागणार्‍या नवरदेवाला व त्याच्या नातेवाइकांना नवरी मुलीने चांगलीत अद्दल घडवली. नवर्‍याने एसयूव्ही गाडीची मागणी करताच नवरीने त्या लोभी नवर्‍याबरोबर विवाह करण्यास नकार दिला.

मुलगी संपातली, तिने मला या माणसाबरोबर निकाह करायचा नाही असे जाहीर केले व नवरा मुलगा आणि त्याच्या नातेवाइकांना एका खोलीत कोंडून ठेवले. नवरीमुलीचे हे आक्रमक रूप बघून हादरलेल्या नवरदेवाने तिची माफी मागितली. नातेवाइकांनी मध्यस्थी करत समजूत काढली.

सहारनपूरमध्ये मोठ्या धूमधडाक्यात पार पडणार्‍या या विवाहास शेकडो लोक आले होते. सगळे वातावरण आनंदाचे असताना अचानक नवर्‍यामुलाने नसरीनच्या वडिलांकडे हुंड्याची मागणी केली. हुंड्यात एसयूव्ही गाडी दिलीत तरच निकाह होईल असे त्याने सांगितले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने इतक्यात कार देणे शक्य होणार नाही असे सांगत मुलीच्या वडिलांनी त्याला निकाह मोडू नकोस अशी विनंती केली. ते त्याच्या घरातल्यांच्या हातापाया पडू लागले. पण जमशेद अडून बसला होता. वडील जमशेदचे हातापाया पडत असल्याचे कळताच मुलीच्या संतापाचा भडका उडाला.