नवी दिल्ली । कथित 400 कोटींचा टँकर घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सचिव बिभव कुमरांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली. केजरीवालांचे सचिव सकाळी आडेअकराला लाचलुचपत प्रतिबिंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी आले होते.
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्शीत यांच्या कारकिर्दीत दिल्लीत 400 कोटी रुपयांचा टँकर घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात केजरीवाल यांचा सहभाग असल्याचा आरोप सरकारमधून बडतर्फ करण्यात आलेले मंत्री कपिल मिश्रा यांनी केला होता. त्यांनी दिलेला जबाब मागील आठवडयत नोंदवण्यात आला होता. या जबाबावरुन काही मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता असून, याप्रकरणाची चौकशी केजरीवालांचे स्वीय सचिवांकडे करण्यात येत आहे.
टँकर घोटाळा प्रकरणात भाजप शीला दीक्षितांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप काही दिवसांपूर्वीपर्यंत स्वता कपिल मिश्रा हे करीत होते पण त्यांनी आता हाच ठपका केजरीवालांवर लावल्याने त्याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे.