होळनांथे। येथील सेंट मदर टेरेसा इंग्लिश मेडीअम स्कूलमध्ये राखी मेकींग, रांगोळी तसेच क्रीडा स्पर्धा व सामुदायिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम नुकताच असून सर्व स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनविणे. यासंदर्भ राखी मेकींग स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या मुलांना बांधण्यात आलेत. याचवेळी रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्या मुलींनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यातून वृक्षारोपण, लेक वाचवा-लेक शिकवासारखे कविशयांवर आढावा घेण्यात आला.
यावेळी प्राचार्य जे. बी. जोसेफ, जिल्हा परिष शाळेचे मुख्याध्यापक पाटील, उपप्राचार्य श्री.जाधव यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. त्याचप्रमाणे खो-खो, कबड्डी, धावणे, लांबउडीसारख्या पावसाळी क्रीडा स्पर्धाही घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन कविता पवार, श्री.सोनवणे, प्रेरणा बारी, दिनेश सुतार, गौरव चौधरी, प्रियंका साळुंखे यांनी केले.