चोपडा (प्रतिनिधी ) — भारतीय जैन संघटना चोपडा व भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते अविवाहित मुलींच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या सामाजिक,भावनिक संकटाना तोंड देण्यासाठी दोन दिवशीय कार्यशाळा नुकतीच भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील विद्यालयात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चहार्डी विद्या प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ. शुभदा पाटील होत्या. या कार्यशाळेत मास्टर ट्रेनर तथा भारतीय जैन संघटनेचे राज्य सहसचिव रत्नाकर महाजन यांनी मार्गदर्शन केले.आयोजित स्मार्ट गर्ल शिबिर लव जिहाद पासून हिंदू मुलींचे संरक्षण व्हावे या सुरक्षा शिविराचे मुख्य वक्ता म्हणून आणि प्रशिक्षक रत्नाकरजी महाजनानी आपल्या उद्बोधनाने संपूर्ण परिसरला बांधून ठेवले होते। त्यानी मुलींन बद्दल अनेक संवेदनशील व हृदय स्पर्शी गोष्टी सांगितल्या त्यामुळे तिथे बसलेला प्रत्येकजन भावुक झाला होता
मुलींमध्ये स्वतःच्या सक्षमीकरणाबद्दल विश्वास निर्माण करणे,मुलींना सभोवतालची परिस्थिती स्विकारायला मदत करून सकारात्मक दृष्टीने प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे,खऱ्या व काल्पनिक धोक्यांना घाबरून राहण्या पासून प्रवृत्त करणे, मुलींमध्ये आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय तर्कसंगत पद्धतीने घेण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे, ही प्रमुख ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुलींमध्ये आत्मजाणीव,निरोगी संवाद व निरोगी नाती जपणे,माझे गुण माझी ताकद, स्वतःला जपूया निर्भय होऊया, तसेच मासिक पाळी व स्वच्छता , निवड आणि निर्णय,मैत्री आणि मोह अशा विविध विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला.दोन दिवसीय या कार्यशाळेत अनेक खेळ व कृतीयुक्त लहान लहान सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.त्याच प्रमाणे समारोप प्रसंगी उपस्थित महिला पालकांनी संवाद करून जैन संघटनेने आणि ऑडिओ विज्युअल च्या माध्यमातून मुलींशी मैत्रीपूर्ण वातावरणात संवाद साधण्यात आला.तसेच त्यांच्या समस्या व शंकाचे निरीसन करण्यात आले . तसेच पालक चर्चासत्र घेण्यात आले.कार्यशाळेला संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश शामराव पाटील यांनी भेट दिली.भारतीय जैन संघटना शाखा चोपडा चे अध्यक्ष निर्मल जैन,महिला अध्यक्ष मानसी राखेचा,सचिव गौरव कोचर,महिला सचिव योगिता बोथरा,विभागीय उपाध्यक्ष तसेच पत्रकार लतिष जैन आणि विद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर.सोनवणे,उपशिक्षिका आर.पी.लांडगे,एस.एन. चव्हाण अनिता पाटील, उपशिक्षक अतुल चौधरी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.