नंदुरबार। नंदनगरी क्रीडा महोत्सव समिती आयोजित 17 वर्षीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत तळोदा येथील एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम हायस्कुलने कांस्य पदक पटकाविले. नंदुरबार नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेशभैय्या रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त नंदनगरी क्रीडा महोत्सव समितीतर्फे नंदुरबार येथील यशवंत विद्यालयाच्या क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 17 वर्षाआतील गटात तळोदा येथील एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम हायस्कुलच्या संघाने कांस्य पदक पटकाविले.
या संघात यश महाजन, पवन तेली, स्वप्निल मराठे, निशाद चौधरी, हर्षिद महाजन, भुषण पाटील, आदित्य तिवारी यांनी उत्कृष्ठ खेळ दाखविला. त्यांच्या यशाबद्दल हायस्कुलच्या मुख्याध्यापिका एलिस मॅडम यांनी अभिनंदन केले. विजयी संघास क्रीडा शिक्षक जगदिश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले.