धुळे । महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्या राज्य व विभागीय पदाधिकार्यांचा धुळे, नंदुरबार जिल्ह्यांचा आगार भेटींचा दौरा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या दैर्यात एस.टी.महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांपासून आगारात कार्यरत असणार्या आगार व्यवस्थापक व सहाय्यक वाहतूक अधिक्षकांबद्दल चालक, वाहक कर्मचारी व प्रवाशांकडून गंभीरतक्रारी करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही बसस्थानकांमध्ये प्रचंड घाणींचे साम्राज्य असून चालक, वाहकांसह प्रवाशांना पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था नसल्याने धुळे परिवहन महामंडळाबद्दल तीव्र संतापाची भावना आढळून आल्याचे या दौर्यात उघडकीस आले आहे. महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्यासह नितीन जगताप, हेमराज साळुंखे, भाई देसले, कार्याध्यक्ष सुरेश अहिरे(मामा), आय.एन.मिर्झा, विश्वास नुजगे, धुळे आगार अध्यक्ष बापू ढेकळे, बंडू पाटील, खजिनदार मनोज गवळी, राजेश पानपाटील, रविंद्र चौधरी यांच्यासह 25 पदाधिकारी दौर्यात सहभागी झाले होते.
नवीन सभासदांची नोंदणी
या पदाधिकार्यांनी शिरपूर, शिंदखेडा, दौंडाईचा, शहादा, नंदुरबार, अक्कलकुवा, नवापूर, साक्री व धुळे आगाराला दोन दिवसांमध्ये भेटी दिल्यात. दौर्यात शहादा आगार आणि साक्री आगारांबाबत गंभीर तक्रारी वाहक व चालकांकडून करण्यात आल्यात. या भेटीप्रसंगी शिवसेनेचे त्या-त्या विभागातील जिल्हाप्रमुखांसह प्रमुख पदाधिकारीहीदौर्यात सहभागी झाले होते. यामध्ये हेमंत साळुंखे, विक्रांत बाबा मोरे, आमशा दादा पाडवी यांच्यासह छोटू पाटील, विश्वनाथ पाटील, भरतसिंग राजपूत, राजू टेलर, हिम्मतराव महाजन, शानाभाऊ सोनवणे, भूपेश शहा, आप्पा चौधरी, वामनराव दासभाऊ, चेतन राजपूत, शैलेश सोनार, गिरीश देसले, सर्जेराव आप्पा, कल्याण बागल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर दौर्यात विविध कामगार संघटनांच्या चालक, वाहक सभासदांनी महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेत प्रवेश केला. जवळपास नव्याने 500 नवीन सभासदांची नोंदणी या दौर्यात करण्यात आली.