प्रवाशाची पर्स केली परत
शहादा । येथील एस.टी.च्या वाहकाने बसमध्ये सापडलेली प्रवाशाची पर्स परत करत प्रामाणिकपणा दाखविला आहे. त्या पर्समध्ये सोन्याची पोत आणि महागडा मोबाईल होता. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाहकाने प्रामाणिकपणा दाखवून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू परत करून इतर कर्मचार्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
धुळे विभाग शहादा आगारातील वाहक शिवशंकर प्रकाश देशमुख परळी ते शहादा सेवेवर असतांना बसमध्ये महिला प्रवाश्याची पर्स आढळून आली. ती त्यांनी बस शहादा आगारात पोहचल्यावर आगारातील वरिष्ठ अधिकारी मगरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या स्वाधीन केली. त्या पर्समध्ये सोन्याची पोत व एक मोबाईल होता. या पर्समध्ये अंदाजे एक लाख रुपये रक्कमेच्या वस्तू होत्या. वस्तू संबंधित प्रवाशाला आगारातील अधिकारी मगरे व वाघ यांच्यासमोर परत करण्यात आली. तसेच मगरे यांनी प्रवाश्याची चौकशी करून त्यांच्या हाती सोन्याची पोत व मोबाईल दिला. त्यावेळेस प्रवाशाने वाहक शिवशंकर देशमुख आणि चालक नरेंद्र पाटील यांचे आभार मानले.
Prev Post