धुळे । विविध संघटना संपावर जाताना पदाधिकार्यांची बैठक घेतात नंतर पत्रकार परिषद घेऊन संपाची घोषणा करतात. पण एसटी कर्मचार्यांच्या राज्यव्यापी संपासाठी राज्यात पहिल्यांदाच मतदान घेतले गेले. त्याचा निकाल नुकाताच जाहीर झाला असून, यात 90 टक्के कर्मचार्यांनी संपाच्या बाजूने मतदान केले आहे. एसटी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळावेत, यासाठी जून महिन्यात एसटी कर्मचार्यांनी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यभरातील मतांची धुळ्यात मोजणी
पण यासाठी पारंपरिक पद्धतीने निर्णय घेण्याऐवजी कर्मचार्याचें म्हणणें जाणून घेण्यात आलें.या संपासाठी कायद्यानुसार, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून 26 आणि 27 मे रोजी एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व आगारात मतदान घेण्यात आलें. या मतदान प्रक्रियेत राज्यातील सर्व एसटी कर्मचार्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. धुळे एसटी आगारात या मतदान प्रक्रियेची मतमोजणी झाली. यात 90 टक्के एसटी कर्मचार्यांनी संपाच्या बाजूनें मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाच्या माध्यमातून कर्मचार्यांचा कौल जाणून घेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. लोकशाहीच्या माध्यमातून संपाचा निर्णय घेण्यात आल्याने सर्वच कर्मचार्यांना आपलें म्हणणे मांडता आले.