जळगाव : पाचोरा तालुक्यातील विवाहिता बसमधून प्रवास करीत असताना चोरट्यांनी विवाहितेच्या बॅगेतून सोन्याच्या दागिण्यांसह रोकड मिळून 36 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
आशाबाई हेमराज पाटील (40, आसनखेडा, ता.पाचोरा) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून गुरुवार, 21 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता त्या जळगाव कामानिमित्त आल्या होत्या. काम आटोपून त्या बसमध्ये पाचोरा जाण्यासाठी बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीची 10 ग्रॅम सोन्याची चैन आणि एक हजार 200 रुपयांची रोकड मिळून 36 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार माहिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी शनिवार, 23 एप्रिल रोजी रात्री एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गफ्फार तडवी करीत आहे.