एस.टी.बसच्या अपघातात बसचे 80 हजाराचे नुकसान

0

पाणबारा ते सोनखांब दरम्यान घडला अपघात
नवापूर :
एस.टी.बसला समोरुन येणार्‍या लक्झरी बस चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात असतांना वेगावर नियंत्रण न राहिल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला चालकाच्या बाजूने धडक दिल्याने अपघात झाला. यात एसटीचा चालक आर.ए. शेख यास डावा पाय आणि हातास मुकामार बसला आहे. वाहक आर.आर. सोमाणी यांनाही दुखापत झाली आहे. अपघातात बसचे 80 हजाराचे तर लक्झरीचे 25 हजाराचे नुकसान झाले आहे. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यातील पाणबारा ते सोनखांब दरम्यान हा अपघात घडला.

जालना-सुरत आगाराच्या एस.टी.बस क्र.एमएच-20 बीएल-2880 पहाटे 3 वाजता लक्झरी बस क्र.जीजे-03बीडब्ल्यू-9596 ने समोरुन जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. 14 प्रवासी होते. त्यांना विसरवाडी रुग्णालयात दाखल केले आहे. 23 /2019 प्रमाणे लक्झरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.