जळगाव । खाजगी वाहन धारकांच्या मनमानी कारभारामुळे खाजगी वाहनाशी प्रवास करणे अवघड बनले आहे. खाजगी वाहनाने प्रवास करणे असुरक्षीततेचे बनले आहे. सुरक्षीत प्रवासाची हमी फक्त शासकीय वाहनाने असल्याने प्रत्येक सामान्य व्यक्ती सुरक्षेच्या दृष्टीने शासनाच्या गाड्यातून प्रवास करण्यास पंसती देतो. प्रत्येक सामान्य, तळागाळातील माणसाला परवडणारी त्यांच्या हक्काची वाटणारी गाडी म्हणजे परिवहन महामंडळाची एसटी बस. परंतु एसटी बसचा प्रवास देखील धोकेदायक बनत चालल्याची सध्याची स्थिती आहे. त्यामुळे एसटी बसचा प्रवास म्हणजे नको असा प्रत्येक माणसांना वाटायला लागले आहे. एसटी महामंडळाच्या बसस्थानक तर डंपींग ग्राऊंडच बनले आहे. परंतु गाड्या देखील अस्वच्छ बनले आहे. गाड्यामध्ये बिघाड असल्याने ह्या गाड्यांचा आवाज देखील मोठा होत आहे. अस्वच्छता व मोठ्या आवाजामुळे एसटी महामंडळाच्या गाड्याने प्रवास करणे सामान्य माणसाला असह्य बनत चालले आहे. वृध्द तसेच आजारी माणसासाठी तर एसटीचा प्रवास जीवघेणा बनला आहे.
धुळ साचल्याने आरोग्यास धोका
धुळीमुळे विविध प्रकारचे आजार जडतात. महामंडळाच्या गाड्याने प्रवास करणे धोक्याचे असल्याचे कारणांपैकी एक म्हणजे धुळीचे आहे. महामंडळाच्या गाड्यात प्रचंड धुळ साचलेली असल्याने तो प्रवाशांसाठी धोकेदायक आहे. लहान मुल, वृध्द यांच्यासाठी तो जास्त धोकेदायक आहे. परंतु याकडे महामंडळाने तुर्तास दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या जीवाशी परिवहन महामंडळ खेळ करत असल्याने दिसून येते.
आसने बसण्या योग्यनाही
एसटी गाड्याने प्रवास करणार्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. परंतु खाजगी वाहनाच्या असुरक्षीत प्रवासामुळे आजही अनेक व्यक्ति सुरक्षीततेच्या दृष्टीने महामंडळाच्या गाड्यांनाच पसंती देतो. प्रवास शुल्कात सुट असल्याने वृध्द, दिव्यांग व्यक्ति एसटी बसनेच प्रवास करतात. परंतु बसमधील सिट मोडके झाल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे वृध्द, दिव्यांग व्यक्ती उभे राहून प्रवास करत असल्याचे दिसते. सिट तुटल्याने सिटचे केवळ लोखंडच उरले आहे. जे सिट साबुत आहेत त्यांचे कापडे फाटले आहे. बसमध्ये चढल्यावर बसावे कुठे? असा प्रश्न प्रवाशांना पडतो.
‘दे धक्का’ बस
महामंडळाच्या बसने प्रवास करणे प्रवासांसाठी तर अवघड आहेतच परंतु वाहन चालकासाठी देखील बस चालवणे कठीण झाले आहे. ह्या बस गाड्या कधी आणि कोठे बंद पडतील याचे नेम नाही. गाड्या पुर्णपणे दुरुस्त नसल्याने ह्या गाड्यांचा आवाज मोठा होतो. हा आवाज वृध्द, आजारी माणसांना असह्य होतो. काही एसटी बसला बाहेरील वाहने पाहण्यासाठी आरसा नसल्याने मागील वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.