शिरपूर । एस.पी.डी.एम.महाविद्यालयात पत्रकार दिवसाच्या निमित्ताने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एस.पी. डी.एम.महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. एन.पटेल तर प्रमुख अतिथी म्हणून शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक रोहित रंधे उपस्थित होते.प्रास्ताविकातून डॉ पटेल यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. डॉ.रजनी लुंगसे यांनी समाजासाठी पत्रकारांच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी उपप्राचार्य दिनेश पाटील, प्रा.डॉ. एम.व्ही.पाटील, प्रा. एस.टी.ठाकरे ,शालिक तिरमले, उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ फुला बागुल यांनी केले.
याप्रसंगी रामदास पुरी, प्रवीण देशमुख, राजेंद्र जाधव, विजय शुक्ल, राजेश भावसार ,रवींद्र भावसार, नरेंद्र राठोड, ईश्वर बोरसे, सचिन पाटील, प्रशांत चौधरी ,सुनील साळुंखे ,सतीश गिरासे, अमोल राजपूत, अंबादास सगरे हिरालाल चौधरी, राजेंद्र पाटील, संतोष भोई ,संजय पाटील या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.