पिंपरी – एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या माध्यमातून व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थांना एमबीएचे दर्जेदार शिक्षण दिले जाते. विद्यार्थांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण देणारी संस्था आहे. हे यश अनुभवी प्राध्यापक वर्ग व संस्थेचे संचालक डॉ. डॅनिअल पेणकर यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले, असे पीसीईटीचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले. आकुर्डी येथील एसबीपीआयएमच्या यावर्षीच्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात प्लेसमेंट विभागाला यश मिळाले. तसेच समर इंटर्नशिप प्लेसमेंटसाठी विद्यार्थांना विद्यावेतन देऊ केलेल्या पंच्चान्नव टक्के कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळाली. या विद्यार्थ्यांचा व प्लेसमेंट विभागाचे प्रा. स्वप्नील सोनकांबळे, प्रा. प्रणिता बुरबुरे यांचा ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव काळभोर, खजिनदार शांताराम गराडे आदी उपस्थित होते.