राज्यातील 17 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या

0

मुंबई : राज्यातील 17 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ए. डब्लयू काकडे यांची पुणे म्हाडाच्या मुख्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुनील पाटील, संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे यांची मंत्रालयातील आदिवासी विकास विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सहकार आणि नोंदणी को-ऑपरेटिव्ह सोसायटी आयुक्त जगदीश पाटील यांची मुंबई येथे कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची नियुक्ती पुणे येथे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आयएएस अधिकार्‍यांच्या नव्या नियुक्त्या पुढील प्रमाणे : राजागोपाल देवरा, सध्या : प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग, मुंबई, नवी नियुक्ती : प्रधान सचिव आणि चीफ प्रोटोकॉल ऑफिसर, सामन्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई. विजय सिंघल, सध्या : विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचलनालय, मुंबई, नवी नियुक्ती : अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका. डॉ. हर्षदीप कांबळे, सध्या : आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग नवी नियुक्ती : विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचलनालय, मुंबई. ए. एल. जर्‍हाड, सध्या : कृषी सचिव, मंत्रालय, मुंबई, नवी नियुक्ती : अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका. जगदीश पाटील सध्या : आयुक्त, सहकार आणि नोंदणी, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, पुणे, नवी नियुक्ती : विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई. विकास देशमुख, नवी नियुक्ती : कृषी सचिव, मंत्रालय, मुंबई. संजय देशमुख, सध्या : अतिरिक्त आयुक्त, मुंबई, नवी नियुक्ती : प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग, मुंबई. निपुण विनायक, नवी नियुक्ती : आयुक्त, लघु बचत आणि राज्य लॉटरी, मुंबई. जयश्री भोज, नवी नियुक्ती : व्यवस्थापकीय संचालक, फिल्मसिटी, मुंबई. शेखर गायकवाड, सध्या : जिल्हाधिकारी, सांगली, नवी नियुक्ती : संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे. बी. एस. कोळसे, सध्या : आयुक्त, लघु बचत आणि राज्य लॉटरी, मुंबई, नवी नियुक्ती : सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय. व्ही. एन. कलाम, सध्या : व्यवस्थापकीय संचालक, फिल्मसिटी, मुंबई, नवी नियुक्ती : जिल्हाधिकारी, सांगली. सुनील पाटील, सध्या : संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे, नवी नियुक्ती : सहसचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय. आर. व्ही. निंबाळकर, सध्या : आयुक्त, पनवेल महानगरपालिका, नवी नियुक्ती : आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका. आर. एस. जगताप सध्या : आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, नवी नियुक्ती : अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर. एस. रामामूर्ती सध्या : सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी, गडचिरोली, नवी नियुक्ती : मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हा परिषद. ए. डब्ल्यू. काकडे, नवी नियुक्ती : मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे.