ऐक्य आणि बंधुता टिकवण्याची हीच ती वेळ; CAB वरून मोदींचे आवाहन !

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायदा अमलात आणला आहे. त्यामुळे मुस्लीम व्यतिरिक्त इतर धर्माच्या लोकांना भारताचे नागरिकत्व बहाल होणार आहे. या कायद्याला विरोध देखील होत आहे. आसाम, दिल्ली, मणिपूर राज्यात या कायद्याला जोरदार विरोध होत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. काल दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सर्व पक्षीय नेते आणि नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मानवतेच्या दृष्टीने हा कायदा केला आहे. सर्वांनी त्याला पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. शांतता, ऐक्य, बंधुता टिकविण्याची ही वेळ असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

आपण सर्वांनी एकत्रितपणे भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक भारतीय, विशेषतः गरीब, वंचित आणि अपंग लोकांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याची काळाची गरज आहे असे मोदी यांनी सांगितले आहे. विरोध, चर्चा करण्याचे लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये असे आवाहन मोदींनी केले आहे.