ऐतिहासिक घोषणा: मुख्यमंत्री बनल्यानंतर दोन तासातच मध्य प्रदेशमध्ये कर्जमाफी !

0

भोपाळ- मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या दोनच तासांत कमलनाथ यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन त्यांनी तंतोतंत पाळले आहे.

निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेसने सत्तेत आल्यास दहा दिवसात कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन कॉंग्रेस पाळणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र मुख्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर अवघ्या दोन तासात कमलनाथ यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे.