पोलिस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशनतर्फे निर्णयाचे स्वागत
पिंपरी : पोलिस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशनच्यावतीने कर्तव्यावर असणार्या मुंबई पोलिसांची ड्युटी 8 तास करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री व सर्व मंत्रीमंडळाचे अभिनंदन करत आहोत. 26 जानेवारी पासून 8 तास ड्युटीचा निर्णय अंमलात आला आहे. असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ड्युटी कमी करण्याबद्दल निवेदन दिले होते. त्याबद्दल आभार मानत असल्याचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी सांगितले.
पोलिसांना जडले विविध आजार!
चिंचवडे यांनी सांगितले की, पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई महानगरातील सर्व पोलीस ठाण्यात आठ तासांचे वेळापत्रक लागू केले आहे. कामाचा अतिरिक्त ताण, कमी संख्याबळ, बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने अशा सततच्या कामांमुळे पोलिसांना विविध आजार जडले आहेत. यातून अनेक पोलिसांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे. 16 तास ड्युटी केल्याची उदाहरणेही कमी नाहीत. त्यामुळे आता पोलिसांना आराम मिळेल. पोलिस कर्मचार्यांप्रती दाखविलेली आत्मीयता या निर्णयातून मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिली आहे.