ऐनपुर गावातून दारू कायमची हद्दपार

0

रावेर।  तालुक्यातील ऐनपुर येथे अखेर बाटली आडवी झाली असून महिला शक्तिचा विजय झालेला आहे. आज दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले होते. यात 2615 महिलांपैकी 1768 महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या उपस्थितीत झालेल्या मतमोजणीत आडव्या बाटलीला 1555 मते मिळाली तर उभ्या बाटलीला 89 मते मिळाली तर 124 मते बाद झाली आहे. यावेळी महिलांनी एकच जल्लोष केला. गावातील शाळकरी मुले, कामाला जाणार नागरिक प्रचंड दारुच्या आहारी गेले होते. अनेक महिलांना व्यसनाच्या नशेत पुरुषांकडुन मारहाण होत होती. यासाठी मागील सहा महिन्यांपासून गावात दारूबंदसाठी प्रचंड महिला एकवटल्या होत्या. मतदानच्या दिवशी एकही महिला कामाला गेली नव्हती. विधानसभा, लोकसभा, मतदानापेक्षाही मोठी गर्दी महिलांची आज सकाळपासून होती. मागील आठ दिवसांपासून गावात दारू बंद विरोधात प्रचार प्रसार सुरु होता. आणि अखेर आज मतदान घेऊन दारू बाटली आडवी करण्यात आली आहे. यावेळी मतदानाला गावातील नागरिकांनी सुध्दा प्रचंड प्रतिसाद देऊन सहकार्य केले

असा आहे दारू बंदीसाठी घटनाक्रम
29 एप्रिल रोजी दारू बंद संदर्भात महिला ग्रामसभेत निवेदन, 1 मेला दारू बंदचा जनरल ग्राम सभेत ठराव 5 मेला ग्राम पंचायतचा जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव रवाना 7 जुन ला प्रस्तावाची पडताळणी, 1 ऑगस्टला निवडणूक घेण्याचे तहसिलदारांना पत्र 11 ऑगस्टला मतदान आणि ‘बाटली आडवी ’ असा आहे. ऐनपुर गावातील महेंद्र परमिट बियर बार, रंगोली बियर बार आणि देशी दारुचे दुकान कायम स्वरूपी बंद होणार आहे. दारूमुळे अनेक बघिनिचे संसार उध्वस्त मातोश्री रमाबाई बहुउद्दीशिय संस्थेच्या माध्यमातून गावातील महिलांचे संघटन केले आणि गावात महिलानंमध्ये दारू बंद बाबत जागृता निर्माण करण्यात आली होती. त्यानंतर महिला ग्रामसभेत या संदर्भात आवाज उठवून दारूमुळे माझ्या अनेक बहिणींचे संसार उध्वस्त झाले. शाळेत जाणारे मुले दारुच्या आहारी गेले आहेत. अनेक घरात दारूमुळे भांडण मोठ्या प्रमाणावर होत होत्या. त्यामुळे शासन दरबारी लढा देऊन स्रीशक्तीने अखेर बाटली आडवी पडलेली आहे.

यांची होती उपस्थिती
निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विजयकुमार ढगे, गटविकास अधिकारी सानिया नाकाडे, नायब तहसीलदार बंडु पाटील, श्रीमती देशमुख, व महसूल कर्मचारी आदींनी निवडणूक प्रक्रिया सुळळीत पार पाडली. यावेळी उत्पादन शुल्क विभागचे ए.बी.पवार, जे.बी.इंगळे, एम.पी. पवार, एच.एम.ब्राम्हणे, वाय.आर.जोशी उपस्थीत होते. निभोरा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला तर सहकार्य ग्रामसेवक प्रितम शिरतुळे व ग्रामस्थांनी केले.