ऐनपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह उपसरपंचाविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव दाखल

0

रावेर- तालुक्यातील ऐनपूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सोमवारी येथील तहसीलदारांकडे दाखल करण्यात आला. ऐनपूरच्या सरपंच योगीता बाळू भील आणि उपसरपंच श्रीराम तुकाराम महाजन हे विश्‍वासत घेवून कामकाज करीत नाहीत, मनमानी कारभार करतात, सदस्यांना शासकीय योजनांची माहिती देत नाहीत, सदस्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असे अविश्‍वास पत्रात म्हटले आहे. पत्रावर सदस्य विजय पाटील,गोकूळ पाटील, अनिल जैतकर, शेख युसूफ शेख सांडू,सुनील खैर, परेश पाटील, मंदा महाजन, करुणा अवसरमल,आशा कोळी, मालती महाजन, विद्या महाजन आणि प्रियंका पाटील यांच्या सह्या आहेत.