रावेर : उधारीचे अवघे 130 रुपये न दिल्याने रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील युवकाचा खून करण्यात आला होता. गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली होती. या घटनेत भीमसिंग जगदीश पवार (28) याचा मृत्यू झाला तर संशयीत पन्नालाल सोमा कोरकू (50, रा.ऐनपूर) हा पसार झाला होता मात्र निंभोरा पोलिसांनी धामोडी जंगलातून त्यास अटक केली. आरोपीस रावेर न्यायालयात हजर केले असता 9 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
उधारीचे पैसे न दिल्याने तरुणाचा खून
ऐनपूर गावातील वाल्मीक नगरात पन्नालाल कोरकू यांची टपरी असून भीमसिंग पवार यांच्याकडे त्यांचे 130 रुपये उधारीचे बाकी होते. ते देण्यावरून कोरकू यांनी गुरुवारी पवार यांच्याशी वाद घालत पवार यांचे गुप्तांग पिळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवार, 5 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर संशयीत आरोपी पसार झाला होता मात्र धामोडीच्या जंगलातून त्यास अटक करण्यात आली. शुक्रवारी त्यास रावेर न्यायालयात हजर केले असता त्यास 9 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सहा. निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.