शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांचा इशारा
पिंपरी-चिंचवड : महापालिका विधी समितीच्या सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषय तहकूब केले जातात. तर, ऐनवेळचे विषय मंजूर करण्याचा सपाटा लावला आहे. ऐनवेळचे विषय घेण्यामध्ये विधी समितीचे सभापती राजकारण करत आहेत. त्यामुळे यापुढे विधी आणि स्थायी या समितींसह कोणत्याही विषय समितीत एकही ऐनवेळचा विषय घेऊ नये. अन्यथा या विरोधात न्यायालयात जाऊ, आंदोलने करु असा, इशारा शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिला आहे.
सर्वच सदस्यांचे विषय घ्या
पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेच्या विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवारी (दि.17) पार पडली. या सभेत अजेंड्यावर असलेले दोन विषय तहकूब करण्यात आले. तर, ऐनवेळचे सहा विषय सभेसमोर ठेवण्यात आले होते. परंतु, सहा विषयांपैकी विधी समितीने पाच ऐनवेळचे विषय मंजूर केले. तर, एकच विषय जाणीवपूर्वक वगळण्यात आला. विधी समितीच्या सभापती हे जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसून येते. ऐनवेळचे विषय मंजूर करायचे असतील तर सर्व सदस्यांचे विषय घेणे अपेक्षित होते. ऐनवेळचे विषय मंजूर करायचे नव्हते तर कुठलाच विषय मंजूर करायचा नव्हता. वाकड येथील स्थळ बदलचा विषय प्रशासनामार्फत आला होता. त्यामुळे या विषयाला विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते.