ऐनवेळी बोहल्यावर चढून तिने राखला दोन्ही घरचा मान

0

पिंपरी-चिंचवड : दोन दिवसांवर लग्न असताना नव्या नवरीने जग सोडले. वर व वधूच्या दोन्ही घरावर आलेल्या संकटात लहान बहिणीने ऐन वेळी बोहल्यावर चढाण्याचा निर्णय घेऊन दोन्ही घरांना सावरलं.चिंचवडच्या सकाटे कुटुंबातील थोरली मुलगी सीमा हिने लग्नापूर्वीच आपले आयुष्य संपवले. सीमाचे आशा अचानक जाण्याने सकाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. महिनाभरापासून घरात चाललेली लगीन घाई अचानक थांबली. नवर्‍या मुलाच्या घरचेही प्रसंग ओळखून कर्‍हाड वरून तातडीने चिंचवडला आले.

सीमावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण घरात आलेली पाहुणे मंडळी, दारात घातलेला मांडव, वाटलेल्या लग्न पत्रिका पाहता गावातील जाणकारांनी छोटी बहीण पूजाला लग्नास तयार करण्याचा विचार मांडला. पुजानेही परिस्थितेचे भान ओळखत आढेवेढे न घेता होकार दिला. त्यामुळे पाहुणे मंडळींच्या डोळ्यात एकीकडे दु:खाचे आश्रू तर दुसरीकडे आनंद आश्रू अशी परिस्थिती झाली होती.

पूजाच्या या निर्णयाने ठरल्या वेळेत, ठरल्या ठिकाणी लग्न लागले. सीमाच्या जाण्याने जी कमी निर्माण झाली ती जरी भरून निघाली नसली तरी पूजाच्या मोठ्या मनाने दोन्ही कुटुंबाला संकट काळात आधार दिला.