ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी शेतीसाठी विकावे लागले मंगळसूत्र

0

बीड : सध्या शेतकरी संप सुरू असतानाच महाराष्ट्राची घडी विस्कटलेली दिसते. शेतकर्‍यांवर कर्जाचा जोंगर उभा असताना त्यांना पुढच्या कामासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्‍न पडला आहे आणि तोच प्रश्‍न ते सरकारला विचारत आहेत. हीच परिस्थिती बीड मधील लक्ष्मीबाई घुंबरे यांचीदेखील आहे. दुष्काळामुळे मागील चार वर्षांपासून दुष्टचक्रात त्यांची शेती वाया गेली. ह्याच शेतीला सावरण्यासाठी विवाहिता लक्ष्मीबाई श्रीरंग घुंबरे यांना ऐन वट पौर्णिमेच्या दिवशी त्यांचे सौभाग्याचे लेणे म्हणजेच मंगळसूत्र विकण्याची वेळ आली आहे. अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पण लक्ष्मीबाईंचा मोठेपणा पाहण्यासारखा आहे की त्यांनी आपल्या शेतीता विचार करुन आपलं मंदळसूत्र गहाण ठेवायलाही मागेपुढे पाहिले नाही. आपली शेती नांगरली जावी यासाठी त्यांनी उभारलेले हे पाऊस एक आदर्श उदाहरण ठरले आहे.

नातेवाईकांचीही मिळाली नाही मदत
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घुंबरे वस्तीवर लक्ष्मीबाई घुंबरे (55) यांना चार एकर शेती असून त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. मागील चार वर्षांपासून आष्टी तालुका दुष्काळाने होरपळत आहे. मागच्या वर्षी बळीराजा बरसला, परंतु कमी उत्पन्न हाती आले. लक्ष्मीबाई या इतरांच्या शेतात मोलमजुरी करत आहेत. शेतीत केलेला खर्च निघाला नसल्याने त्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. खरीप हंगामातील बियाणे खरेदीची चिंता त्यांना सतावू लागली. उसने पैसे कोणी देईना. नातेवाइकांकडून मदत होईना. त्यामुळे त्यांनी शेवटी गळ्यातील मंगळसूत्रच विक्री करण्याचा निर्णय घेतला. शेवटी गुरुवारी वटसावित्री पौर्णिमेचा सण असताना मन घट्ट करून बुधवारी त्या आष्टीला आल्या. मंगळसूत्र व नातवाच्या कानातील सोने एका सराफाला विकले. मिळालेल्या पाच हजार रुपयांतून त्यांनी बी- बियाण्याची तरतूद केली आहे.