रायगड – ऑईल सांडल्याने मुबंई-गोवा महामार्गावर, बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. यामुळे लोकांना प्रवासाला खूप अडचण होत आहे.
बोरघाटात अम्रृतांजंन पुलाजवळ रात्री ४ च्या सुमारास ऑईल घेऊन जाणाऱ्या टॅकरमधून ऑइल सांडल्याने महामार्गावर ऑईल पसरले होते. यामुळे वाहने घसरून कोणताही अपघात होऊ नये, यासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक हळुवार जात आहेत.ऑईल पडलेल्या ठिकाणी माती टाकली असून वाहतूक काही प्रमाणात सुरळीत सुरू झाली असली तरी खबरदारीमुळे अवजड वाहने धीम्या गतीने सुरू आहे.