नवी दिल्ली-गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या माध्यमातून ऑक्टोबर २०१८ या एका महिन्यात १ लाख कोटींचा महसूल जमा झाला असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ऑक्टोबर २०१८ मध्ये एकूण १००७१० इतका महसूल जीएसटीच्या माध्यमातून मिळाला आहे. त्यात १६४६४ कोटी सीजीएसटी, एसजीएसटी २२८२६ कोटी, आयजीएसटी ५३४९ कोटी आणि सेस ८००० हजार कोटी असा महसूल जीएसटीच्या माध्यमातून जमा झाला आहे.