गोरखपूर । ऑक्सिजन न मिळाल्याने येथे 30 लहानग्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली. ऑक्सिजन पुरवठा करणार्या कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवल्यामुळे ही घटना घडली.
बीआरडी हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांपूर्वीच लिक्विड ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आले होते. या द्वारे एन्सेफलायटीस वॉर्डसह शेकडो रुग्णांना नळीद्वारे ऑक्सिजन दिले जात होते. पैसे थकवल्याने गुरूवारी रात्रीपासून या रूग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला होता. ऑक्सिजन पुरवठा करणा-या फर्मचे 69 लाख रूपये न भरल्याने कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला होता. यामुळे 30 चिमुरड्यांना प्राण गमवावे लागले आहे. या ह्रदयद्रावक दुर्घटनेत नेमके किती बळी गेले याबाबत अजून अधिकृत आकडेवारी समजू न शकल्याने मृतांचा आकडा बदलू शकतो.